केस गळणे आणि पोषण : आहारातील कमतरतेमुळे केस का गळतात?
केस गळणे आणि पोषण : आहारातील कमतरतेमुळे केस का गळतात?
आजकाल केस गळती ही समस्या लहान‑मोठ्या सर्व वयोगटांत वाढताना दिसते. केवळ सौंदर्याचा प्रश्न न राहता, ही समस्या आरोग्याशी थेट संबंधित आहे. चुकीचा आहार, पोषणतत्त्वांची कमतरता आणि जीवनशैलीतील बदल हे केस गळतीमागील महत्त्वाचे कारण ठरतात.
केस गळतीची मुख्य कारणे :
पोषणाचा अभाव
शरीराला आवश्यक असलेली पोषकतत्त्वे(विटामिन्स) पुरेशा प्रमाणात न मिळाल्यास केसांची वाढ मंदावते. केस कमकुवत होतात, तुटतात आणि गळू लागतात. सतत डाएटिंग(Fad Diets) , जंक फूड, अनियमित जेवण यामुळे ही कमतरता अधिक वाढते.
केस मजबूत राहण्यासाठी कोणती पोषकतत्त्वे आवश्यक आहेत?
केस निरोगी ठेवण्यासाठी प्रोटीन, लोह(Iron) , व्हिटॅमिन्स, खनिजे(Minerals) आणि आवश्यक फॅटी अॅसिड्स (Essential Fatty acids) गरजेचे असतात. ही पोषकतत्त्वे केसांच्या मुळांना पोषण देऊन वाढीस मदत करतात.
प्रोटीन कमतरता आणि केस गळती यांचा संबंध
केस प्रामुख्याने केराटिन या प्रोटीन नी बनलेले असतात. आहारात प्रोटीनची कमतरता असल्यास केस पातळ होतात आणि मोठ्या प्रमाणात गळतात. डाळी, कडधान्ये, दूध‑दही, अंडी, मासे हे प्रोटीन चे चांगले स्रोत आहेत.
लोह (Iron) कमी असल्यास केसांवर होणारे परिणाम
लोहाच्या कमतरतेमुळे टाळूपर्यंत पुरेसा ऑक्सिजन पोहोचत नाही. परिणामी केस गळती वाढते. महिलांमध्ये ही समस्या अधिक दिसून येते. हिरव्या पालेभाज्या, गूळ, डाळिंब, खजूर यांचा आहारात समावेश करणे उपयुक्त ठरते. कृपया हा वीडियो बघा
https://youtu.be/sOK_onizK7M?si=gbBmHEqOk9ay5HfX
व्हिटॅमिन B12 कमतरता : केस गळतीचे दुर्लक्षित कारण
व्हिटॅमिन B12 केसांच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक आहे. त्याची कमतरता असल्यास केस गळतीसोबत थकवा, अशक्तपणा जाणवू शकतो. दूध, दही, अंडी, मांसाहारातून B12 मिळते. शाकाहारी लोकांना पूरक औषधांची गरज लागू शकते.
झिंक आणि ओमेगा‑3 : केसांच्या वाढीसाठी आवश्यक घटक
झिंक केसांच्या मुळांची दुरुस्ती करते, तर ओमेगा‑3 टाळू कोरडी पडण्यापासून वाचवते. अलसी(जवस) , अक्रोट, तीळ, भोपळ्याच्या बिया यांचा आहारात समावेश फायदेशीर ठरतो.
डाएटिंग आणि अचानक वजन कमी केल्यामुळे केस का गळतात?
अचानक वजन कमी करणे किंवा खूप कमी कॅलरीचा आहार घेतल्यास शरीर आवश्यक कार्यांसाठी ऊर्जा वाचवते. अशावेळी केसांची वाढ थांबते आणि गळती वाढते.
पाणी कमी पिल्याने केस गळतात का?
होय. शरीरात पाण्याची कमतरता असल्यास टाळू कोरडी पडते आणि केस निस्तेज होतात. दररोज किमान २ ते २.५ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.
फक्त तेल‑शॅम्पू पुरेसे आहेत का? पोषणाचे महत्त्व
तेल, शॅम्पू, सीरम हे बाह्य उपाय आहेत. मात्र केसांचे खरे पोषण आतून मिळते. संतुलित आहाराशिवाय केवळ बाह्य उपचार उपयोगी ठरत नाहीत.
केस गळतीसाठी रक्ततपासणी कधी आवश्यक असते?
केस गळती अचानक वाढल्यास किंवा दीर्घकाळ चालू असल्यास रक्ततपासणी करून लोह(Iron and Haemoglobin) , विटामिन B12, व्हिटॅमिन D यांची पातळी तपासणे आवश्यक असते.
केस गळती थांबवण्यासाठी आहारात काय बदल करावेत?
घरगुती, ताजे अन्न, पुरेसे प्रोटीन, फळे‑भाज्या आणि ड्रायफ्रूट्स यांचा समावेश करावा. जंक फूड आणि साखरेचे प्रमाण कमी करावे.
महिलांमध्ये केस गळती आणि पोषणाची भूमिका
पाळी, गर्भधारणा, प्रसूतीनंतरचा काळ आणि Menopause या टप्प्यांमध्ये महिलांना पोषणाची विशेष गरज असते. या काळात योग्य आहार न घेतल्यास केस गळती वाढू शकते.
केस गळतीसाठी डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?
केस मोठ्या प्रमाणात गळत असतील, टक्कल पडण्याची चिन्हे दिसत असतील किंवा इतर शारीरिक तक्रारी असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
नैसर्गिक पद्धतीने केस मजबूत कसे करावे?
संतुलित आहार, पुरेशी झोप, तणाव नियंत्रण, सौम्य शॅम्पूचा वापर यामुळे केस नैसर्गिकरित्या मजबूत होतात.
संतुलित आहार आणि निरोगी केस : निष्कर्ष
केसांचे आरोग्य हे आपल्या दैनंदिन आहारावर अवलंबून असते. योग्य पोषण, शिस्तबद्ध जीवनशैली आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला घेतल्यास केस गळती नियंत्रणात ठेवणे नक्कीच शक्य आहे.
About the author :
Dr Sneha Banerjee is a renowned Dermatologist (Skin specialist) who has been treating patients with skin and hair problems over last 17 years. The science based skin treatment provided by Dr Sneha Banerjee has been extremely successful and her protocols have cured thousands of patients over the years. The treatment success chronicles written by patients on her social media account tells volumes of her professionalism. In her YouTube channel, Dr Sneha Banerjee shares skin & hair tips which she has gained by treating thousands of patients over the years. She demystifies skin and hair related myths and provides genuine advice which are long term beneficial for the patients. Dr Sneha's treatment is based on modern dermatological practices validated by research at national and international level. Dr Sneha Banerjee is known for genuine, trustworthy, cost effective treatment of skin, nails, hair, acne (pimple), acne scar, nail disorders, hair loss issues, dandruff, white hair problems, psoriasis, eczema, corn, mouth ulcers, boils, dry and oily skin, vitiligo (white spots), children's skin problem, sun allergies, skin aging problems, pigmentation, cracked heels, leprosy, chicken pox and herpes. The doctor's clinic has facilities like Dermoscope, RF Cautery Procedures, Nail Surgeries, Acne (Pimples and Acne Scar Surgeries chemical peels), dermatologic surgeries for moles cysts, warts, keloid and skin tumors.
Honours and Awards:
• MBBS from Government Medical College , Solapur
• Post Graduation DNB from 120 year OPD Government Medical Hospital, Secunderabad.
• Member of National Academy of Medical Sciences , New Delhi
• M.R.C.P. (London,UK)-SCE Dermatology
• Member of European Academy of Dermatology
• Recipient of the Prestigious Post graduate Grant from Galderma in 2010
• Award in Seminar Presentation competition at Medical Research Council
• 26th Rank in State Merit List in S. S. C.
• 12th Rank in Maharashtra State Scholarship Examination ( High School Level)
• Meritorious performance at Kaparekar Mathematics Examination
• Member of the Prestigious Mensa India Club
• Participated as a Consultant in Multi-Speciality Medical Camps held inaccessible tribal areas of Manipur
For consultation and treatment, please contact :
Dr. Sneha's Skin and Allergy Clinic,
Chowk Number 4,
Behind Prakash Petrol Pump,
Govind Nagar,
Nashik, Maharashtra- 422009
Phone : 7588708354, 9293400864 Website : https://www.drsnehaski... Facebook : / dr.snehas.skinandaller...
YouTube : / @drsnehasskinandallerg...
Google : https://g.page/Dr-Sneh...
Instagram : / drsnehabhavsarbanerjee
Comments
Post a Comment