Posts

Showing posts with the label nutrition diet healthy eating skin care dermatologist hair care hair loss hostel paying guests students

हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पौष्टिक आहार पर्याय(Healthy food options for hostel students)

Image
हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पौष्टिक आहार पर्याय (Healthy Eating Hacks for hostel students) हॉस्टेलमध्ये किंवा घरापासून दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना संतुलित आणि पौष्टिक आहार मिळणे अनेकदा कठीण जाते. वेळेची कमतरता, मर्यादित सुविधा आणि मेसवर अवलंबून राहणे यामुळे पोषणाकडे दुर्लक्ष होते.  मात्र काही सोपे, सहज उपलब्ध आणि घरून पॅक करून नेता येणारे अन्नपदार्थ वापरल्यास तुमचे पोषण नक्कीच सुधारू शकते. 1) दूध आणि दुग्धजन्य पदार्थ दूध, दही किंवा योगर्ट हे प्रोटीन आणि कॅल्शियमचे चांगले स्रोत आहेत. हे पचायला हलके असून शरीराला आवश्यक एनर्जी देतात. रोजच्या आहारात यांचा समावेश करणे फायदेशीर ठरते. 2) उकडलेली अंडी उकडलेली अंडी हा स्वस्त, सोपा आणि उच्च-प्रोटीन पर्याय आहे. हॉस्टेलमध्ये सहज तयार करता येत असल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हा अतिशय उपयुक्त पर्याय आहे. 3) नट्स आणि ड्रायफ्रूट्स शेंगदाणे, बदाम, पिस्ता, अक्रोट यांसारखे नट्स आणि ड्रायफ्रूट्स शरीराला चांगली एनर्जी देतात. यामध्ये चांगले फॅट्स, प्रोटीन आणि खनिजे(minerals) असतात. थोड्या प्रमाणात(Portion Control)...