जांघेत होणारा फंगल संसर्ग (Tinea Cruris) – रुग्णांसाठी सविस्तर माहिती
जांघेत होणारा फंगल संसर्ग (Tinea Cruris) – रुग्णांसाठी सविस्तर माहिती
जांघेत होणारा फंगल संसर्ग हा त्वचेचा एक सामान्य आजार आहे. तो त्रासदायक असला तरी योग्य काळजी आणि योग्य उपचारांनी पूर्णपणे बरा होऊ शकतो. खाली दिलेली माहिती भारतीय त्वचारोग तज्ञ संघटना (IADVL) व मान्यताप्राप्त त्वचारोग मार्गदर्शक तत्त्वांनुसार आहे.
---
फंगल संसर्ग म्हणजे काय?
जांघ, मांडीच्या आतली बाजू, नितंबांच्या आजूबाजूला होणारा बुरशीजन्य संसर्ग म्हणजे जांघेत होणारा फंगल संसर्ग. हा आजार प्रामुख्याने ओलसर व घामाच्या भागात होतो.
---
लक्षणे कोणती?
सतत खाज येणे
लालसर चट्टे दिसणे
चट्ट्यांच्या कडा उठलेल्या असणे
मध्यभाग तुलनेने कमी लाल असणे
जळजळ होणे
त्वचा सोलणे
हा आजार का होतो?
जास्त घाम येणे
त्वचा सतत ओलसर राहणे
घट्ट कपडे घालणे
लेगिंग्स, जीन्स, सिंथेटिक कपडे वापरणे
लठ्ठपणा
मधुमेह(Diabetes/शुगर चा आजार)
स्वतःहून मेडिकल स्टोर (ओवर द काऊंटर/OTC) च्या चुकीच्या क्रीमचा (स्टेरॉइड) वापर
उपचारात काय महत्त्वाचे आहे?
फंगल संसर्गासाठी फक्त अँटीफंगल औषधेच उपयोगी असतात. डॉक्टरांनी दिलेले क्रीम नियमित व सांगितलेल्या कालावधीपर्यंत लावणे अत्यंत आवश्यक आहे. फक्त खाज कमी झाली म्हणून औषध बंद करू नये.
काय करावे? (DO’s)
जांघेचा भाग स्वच्छ व कोरडा ठेवा
आंघोळीनंतर भाग नीट पुसून वाळवा
सौम्य (माइल्ड) साबण वापरा
साबण मर्यादित प्रमाणात वापरा
सैल, सुती कपडे वापरा
दिवसातून 2–3 वेळा अंडरवेअर बदला
अंडरवेअर उन्हात वाळवा
डॉक्टरांनी दिलेले अँटीफंगल क्रीम नियमित लावा
नखे कापलेली व स्वच्छ ठेवा
काय करू नये? (DON’Ts)
साबणाचा अति वापर करू नका
वारंवार धुणे टाळा
लेगिंग्स, घट्ट जीन्स व सिंथेटिक कपडे घालू नका
स्टेरॉइड क्रीम स्वतःहून वापरू नका
टॉवेल, कपडे इतरांसोबत शेअर करू नका
खाज सुटली म्हणून उपचार लवकर बंद करू नका
साबणाचा अति वापर का टाळावा?
खासगी भागातील त्वचा अतिशय नाजूक असते. जास्त साबण वापरल्याने ही त्वचा कोरडी होते. कोरडेपणामुळे खाज, जळजळ आणि त्रास वाढतो. त्यामुळे नेहमी माइल्ड साबण व मर्यादित वापर करावा.
डॉक्टरांकडे कधी जावे?
2 आठवड्यांत फरक न पडल्यास
संसर्ग वारंवार होत असल्यास
मधुमेह असल्यास
खाज व जळजळ खूप जास्त असल्यास
पुन्हा संसर्ग होऊ नये म्हणून
वजन नियंत्रणात ठेवा
घाम आला की कपडे बदला
पायांना फंगल संसर्ग असल्यास त्यावरही उपचार करा
स्वच्छतेच्या सवयी कायम ठेवा
मधुमेह कंट्रोल मध्ये ठेवणे (शुगर कंट्रोल)
योग्य उपचार, योग्य स्वच्छता आणि योग्य कपड्यांची निवड केल्यास जांघेत होणारा फंगल संसर्ग नक्कीच बरा होऊ शकतो. स्वतःहून औषधे वापरण्यापेक्षा त्वचारोग तज्ञांचा सल्ला घ्या.
Comments
Post a Comment