Posts

Showing posts with the label alopecia hair fall hair loss trichologist dermatologist skin care hair care nutrition dietician

केस गळणे आणि पोषण : आहारातील कमतरतेमुळे केस का गळतात?

Image
केस गळणे आणि पोषण : आहारातील कमतरतेमुळे केस का गळतात? आजकाल केस गळती ही समस्या लहान‑मोठ्या सर्व वयोगटांत वाढताना दिसते. केवळ सौंदर्याचा प्रश्न न राहता, ही समस्या आरोग्याशी थेट संबंधित आहे. चुकीचा आहार, पोषणतत्त्वांची कमतरता आणि जीवनशैलीतील बदल हे केस गळतीमागील महत्त्वाचे कारण ठरतात. केस गळतीची मुख्य कारणे :   पोषणाचा अभाव शरीराला आवश्यक असलेली पोषकतत्त्वे(विटामिन्स) पुरेशा प्रमाणात न मिळाल्यास केसांची वाढ मंदावते. केस कमकुवत होतात, तुटतात आणि गळू लागतात. सतत डाएटिंग(Fad Diets) , जंक फूड, अनियमित जेवण यामुळे ही कमतरता अधिक वाढते. केस मजबूत राहण्यासाठी कोणती पोषकतत्त्वे आवश्यक आहेत? केस निरोगी ठेवण्यासाठी प्रोटीन, लोह(Iron) , व्हिटॅमिन्स, खनिजे(Minerals) आणि आवश्यक फॅटी अ‍ॅसिड्स (Essential Fatty acids) गरजेचे असतात. ही पोषकतत्त्वे केसांच्या मुळांना पोषण देऊन वाढीस मदत करतात. प्रोटीन कमतरता आणि केस गळती यांचा संबंध केस प्रामुख्याने केराटिन या प्रोटीन नी बनलेले असतात. आहारात प्रोटीनची कमतरता असल्यास केस पातळ होतात आणि मोठ्या प्रमाणात गळतात. डाळी, कडधान्ये, दूध‑द...