हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पौष्टिक आहार पर्याय(Healthy food options for hostel students)

हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पौष्टिक आहार पर्याय
(Healthy Eating Hacks for hostel students)

हॉस्टेलमध्ये किंवा घरापासून दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना संतुलित आणि पौष्टिक आहार मिळणे अनेकदा कठीण जाते. वेळेची कमतरता, मर्यादित सुविधा आणि मेसवर अवलंबून राहणे यामुळे पोषणाकडे दुर्लक्ष होते.
 मात्र काही सोपे, सहज उपलब्ध आणि घरून पॅक करून नेता येणारे अन्नपदार्थ वापरल्यास तुमचे पोषण नक्कीच सुधारू शकते.


1) दूध आणि दुग्धजन्य पदार्थ
दूध, दही किंवा योगर्ट हे प्रोटीन आणि कॅल्शियमचे चांगले स्रोत आहेत. हे पचायला हलके असून शरीराला आवश्यक एनर्जी देतात. रोजच्या आहारात यांचा समावेश करणे फायदेशीर ठरते.


2) उकडलेली अंडी
उकडलेली अंडी हा स्वस्त, सोपा आणि उच्च-प्रोटीन पर्याय आहे. हॉस्टेलमध्ये सहज तयार करता येत असल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हा अतिशय उपयुक्त पर्याय आहे.


3) नट्स आणि ड्रायफ्रूट्स
शेंगदाणे, बदाम, पिस्ता, अक्रोट यांसारखे नट्स आणि ड्रायफ्रूट्स शरीराला चांगली एनर्जी देतात. यामध्ये चांगले फॅट्स, प्रोटीन आणि खनिजे(minerals) असतात. थोड्या प्रमाणात(Portion Control)  दररोज घेतल्यास फायदा होतो.


4) फळे
ताजी, सीजन मध्ये मिळणारी आणि लोकल फळे रोजच्या आहारात असावीत. वेगवेगळ्या रंगांची फळे खाल्ल्याने विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात. 

5) ताजे कापलेले सलाड
काकडी, गाजर, मुळा, कांदा, बीट यांचे ताजे कापलेले सलाड हे फायबरयुक्त, हलके आणि पौष्टिक असते. हे सहज तयार करता येते आणि पचनासाठी उपयुक्त ठरते.


6) घरचे बनवलेले लाडू

बेसन लाडू, रागी(नागली) लाडू, बाजरी लाडू, राजगिरा लाडू, शेंगदाणा–गूळ लाडू, तिळाचे लाडू, अळीव लाडू, चिक्की किंवा गजक हे पदार्थ चांगली एनर्जी देणारे आणि पौष्टिक असतात. मधल्या वेळेला (Snack Time) खाण्यासाठी हे उत्तम पर्याय आहेत.

7) लिंबाचा रस(फ्रेश कट केलेला लिंबु) 
जेवणात किंवा वरण/Sprouts वर ताज्या लिंबाचा रस घातल्यास व्हिटॅमिन C मिळते आणि अन्नातील आयर्नचे शोषण सुधारते.


8) ड्राय चटण्या 
शेंगदाण्याची चटणी, तिळाची चटणी, कढीपत्ता चटणी किंवा  जवस ची चटणी या पदार्थांमुळे जेवणाची पौष्टिकता वाढते. यामध्ये प्रोटीन, चांगले फॅट्स आणि खनिजे असतात.


9) घरचे बनवलेले नमकीन
बाजारातील बिस्किटे, चिप्स किंवा कुकीजपेक्षा घरी बनवलेला चिवडा, शंकरपाळे, चकली किंवा मुरुकू हे तुलनेने अधिक पौष्टिक असतात.


10) तूप
वरण -भात किंवा पोळी-भाजीसोबत थोडेसे घरचे तूप घेतल्यास शरीराला चांगली एनर्जी मिळते आणि पोट भरल्यासारखे वाटते.


11) भाजलेले मखाने व फुटाणे 
भाजलेले मखाने हा हलका पण पौष्टिक स्नॅक आहे. रात्री किंवा अभ्यासाच्या वेळेत खाण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.

12) उच्च-प्रोटीन अन्नपदार्थ
भाजलेले चणे, फुटाणे, दूध, दही, नट्स, बिया(seeds) आणि मोड आलेले कडधान्य हे सर्व उच्च-प्रोटीन अन्नपदार्थ आहेत. हे शरीराच्या वाढीस आणि दुरुस्तीस/repair मदत करतात.


13) घरचे पीनट बटर
घरच्या घरी तयार केलेले पीनट बटर हे ब्रेड, पोळी किंवा फळांसोबत खाण्यासाठी चांगला प्रोटीनयुक्त पर्याय आहे.


14) सत्तू
सत्तू पाणी किंवा सत्तू ड्रिंक हे शरीराला पटकन एनर्जी देणारे, पोट भरणारे आणि पौष्टिक पेय आहे.


15) दूध आणि मध
साखरेऐवजी दूधात थोडे मध घालून घेतल्यास ते अधिक पौष्टिक आणि आरोग्यदायी ठरते.


16) इलेक्ट्रिक स्टोव्ह किंवा राईस कुकर
परवानगी असल्यास इलेक्ट्रिक स्टोव्ह किंवा राईस कुकरमध्ये उपमा, पुलाव , नागली खिची किंवा अंडी यांसारखे साधे पदार्थ बनवता येतात. त्यामुळे जंक फूडवर अवलंबून राहावे लागत नाही.


17) मोड आलेले कडधान्य
मूग किंवा चण्याची मोड आलेली कडधान्ये ही प्रोटीन आणि फायबरचा उत्तम स्रोत आहेत. सलाड स्वरूपात खाल्ल्यास ती अतिशय पौष्टिक ठरतात. Sprouter भांड मार्केट मध्ये सगळी कडे मिळते. 
18)उपमा  व  खिचडी चे रेडी मिक्स
उपमा व खिचडी चे रेडी मिक्स घरी बनवू शकता. Youtube वर खूप वीडियो आहेत. 




About the Author :

Dr Sneha Banerjee is a renowned Dermatologist (Skin specialist) who has been treating patients with skin and hair problems over last 17 years. The science based skin treatment provided by Dr Sneha Banerjee has been extremely successful and her protocols have cured thousands of patients over the years. The treatment success chronicles written by patients on her social media account tells volumes of her professionalism. In her YouTube channel, Dr Sneha Banerjee shares skin & hair tips which she has gained by treating thousands of patients over the years. She demystifies skin and hair related myths and provides genuine advice which are long term beneficial for the patients. Dr Sneha's treatment is based on modern dermatological practices validated by research at national and international level. Dr Sneha Banerjee is known for genuine, trustworthy, cost effective treatment of skin, nails, hair, acne (pimple), acne scar, nail disorders, hair loss issues, dandruff, white hair problems, psoriasis, eczema, corn, mouth ulcers, boils, dry and oily skin, vitiligo (white spots), children's skin problem, sun allergies, skin aging problems, pigmentation, cracked heels, leprosy, chicken pox and herpes. The doctor's clinic has facilities like Dermoscope, RF Cautery Procedures, Nail Surgeries, Acne (Pimples and Acne Scar Surgeries chemical peels), dermatologic surgeries for moles cysts, warts, keloid and skin tumors. 

Honours and Awards:
 • MBBS from Government Medical College , Solapur 
• Post Graduation DNB from 120 year OPD Government Medical Hospital, Secunderabad.
• Member of National Academy of Medical Sciences , New Delhi
• M.R.C.P. (London,UK)-SCE Dermatology
• Member of European Academy of Dermatology 
 • Recipient of the Prestigious Post graduate Grant from Galderma in 2010 
• Award in Seminar Presentation competition at Medical Research Council 
• 26th Rank in State Merit List in S. S. C. 
• 12th Rank in Maharashtra State Scholarship Examination ( High School Level)
 • Meritorious performance at Kaparekar Mathematics Examination 
• Member of the Prestigious Mensa India Club 
• Participated as a Consultant in Multi-Speciality Medical Camps held inaccessible tribal areas of Manipur 

For consultation and treatment, please contact :
Dr. Sneha's Skin and Allergy Clinic,
Chowk Number 4,
Behind Prakash Petrol Pump,
Govind Nagar, 
Nashik, Maharashtra- 422009 
Phone : 7588708354, 9293400864 Website : https://www.drsnehaski...​ Facebook :    / dr.snehas.skinandaller...  ​ 
YouTube :     / @drsnehasskinandallerg...  ​ 
Google : https://g.page/Dr-Sneh...​ 
Instagram :    / drsnehabhavsarbanerjee  ​

Comments

Popular posts from this blog

Healthy food options for Hostel Students : How to Improve your nutrition .

मेनोपॉज़ में त्वचा समस्याएं: कारण और उपाय

How I Prepared for MRCP SCE Dermatology